मानसाने कायम विद्यार्थी/आज्ञाथी राहुन नवनवीन ज्ञान आत्मसात करावे जेणेकरुन भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाता येईत. आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देताना असे सांगू इच्छीतो की, प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान ही न संपणारी प्रक्रिया असून या पुढे सुध्दा कर्तव्यावर असतांना वेळोवेळी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक विषयाचे परीपूर्ण ज्ञान प्राप्त करून विविध आव्हानाना तोंड देण्यासाठी कठोर व खडतर मेहनत घेवून जनतेची सेवा करण्याचे व्रत अंगीकाराल व कुठल्याही प्रलोभनांना, अमिषांना बळी न पडता आपण आपले कर्तव्य पार पाडुन आपले शारिरीक, मानसिक स्वास्थ्य सदृढ व निरोगी ठेवाल अशी आशा बाळगतो.
या स्मरणिकेला व आपल्या पुढील वाटचालीस माझ्याकडून व पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथील सर्व अधिकारी, अंमलदार यांच्याकडुन अनेक शुभेच्छा…

पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे