बाह्यवर्ग प्रशिक्षण
प्रशिक्षणार्थींना दररोज सकाळी आणि दुपारी मैदानी प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये 2.400 KM, 5 KM, 10 KM, 21 KM धावणे याचा सराव हप्त्यातून दोन वेळेस केला जातो. पीटी टेबल, पुश अप्स, सिट अप्स, मेडिसिन बॉल, लॉग, क्लाइंबिंग रोप, अडथळे, ड्रिल, परेड, शस्त्र हाताळणे, गोळीबार, योगा, स्पोर्ट्स इव्हेंट ( हाऊस केले आहे त्यामध्ये त्यांचे वेगवेगळे रंगाचे गट पाडले आहेत) वेपन प्रशिक्षण हे डिजिटल बोर्ड मार्फत दिले जाते.
या संस्थेने मासिक बाह्य परीक्षा आयोजित करून सर्व प्रशिक्षणार्थींचा नियतकालिक आढावा घेणे सुरू केले आहे. ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या सहाय्याने परीक्षेच्या प्रत्येक पैलूचे सांख्यिकीय विश्लेषण केले जाते आणि कोणता प्रशिक्षणार्थी कोणत्या इव्हेंटमध्ये मागे पडतो हे सहज ओळखता येते. जेणेकरून आपण त्या व्यक्तीसाठी त्या विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करू शकतो.
दररोज नवप्रविष्ट पोलीस पोलीस प्रशिक्षणार्थी यांना मैदानी खेळ कबड्डी, थाळीफेक, क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल इत्यादी खेळले जातात.
प्रगती अहवाल मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींच्या मान, खांदे, छाती, वरचा हात, कंबर अशा 08 वेगवेगळ्या शारीरिक मापदंडांचे मासिक निरीक्षण सुरू केले. प्रशिक्षणार्थींना सुविकसित स्नायुयुक्त शरीराच्या पोलिसांमध्ये बदलण्यात नक्कीच मदत झाली आहे.