पायाभूत सुविधा
प्रशासकीय इमारत
प्रशासकीय इमारत येथे माननीय प्राचार्य व सर्व मंत्रालय कर्मचारी यांसाठी प्रत्येकी स्वतंत्र कक्ष बनवण्यात आले आहेत यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील सर्व प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवले जाते.

प्रशासकीय इमारत

ज्ञानमंदीर
मॉडेल पोलीस स्टेशन
जिल्हास्तरीवर जे पोलीस स्टेशन उभारणी केलेले आहेत त्या पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज कसे चालते त्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे कामकाज केले जाते त्याचा आढावा घेण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे मॉडेल पोलीस स्टेशन ची उभारणी करण्यात आली आहे ज्यामध्ये जिल्हास्तरीय वरील पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज हे डमी स्वरूपात उभारून नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थ शिपाई यांना त्याचे ज्ञान अवघड व्हावे व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचे कामकाज डायरी अंमलदार व इतर सर्व आमदारांचे काय कामकाज असते हे कामकाज मॉडेल पोलीस स्टेशन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय
राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयामध्ये सर्व नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी शिपाई यांच्या पत्र व्यवहारासाठी व प्रशासकीय कामकाज पहिले जाते.
मोटार परिवहन विभाग
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे मोटार परिवहन विभाग मध्ये सर्व प्रकारचे वाहने व त्यांची देखभालीचे काम योग्य पद्धतीने पाहून सर्व वाहने सुसज्जित ठेवले जातात


नैवेद्यम भोजनालय.
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे मधील नैवेद्यम भोजनालय येथे सुसज्जित आसन व्यवस्था बनविण्यात आलेली आहे यात एका वेळी 380 नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी शिपाई हे जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात.
बहुउद्देशीय सभागृह


शुध्द जलसाठा
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थ शिपाई यांना शुद्ध पाणी जलसाठा याची निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून मुलांना RO चे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे आरोचे शुद्धीकरण वेळोवेळी करून मुलांना रोगराई पासून दूर ठेवण्याचे व शुद्ध पाणी मिळावे याची दक्षता घेतली जाते.
आयुधिक कार्यशाळा
आयूधिक कार्यशाळा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील सर्व प्रकारच्या तांत्रिक बिघाड झालेल्या वस्तू सुरळीत करून त्यांची देखभाल केली जाते.
प्राचार्य निवासस्थान
उपप्राचार्य निवासस्थान
अधिकारी वसतिगृह
तोरणमाळ अधिकारी वसतिगृह
साय्याद्री अधिकारी वसतिगृह
तापी वसतीगृह
पांझरा वसतिगृह
वसतीगृह
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांना आरामाकरिता पांजरा वसतिगृह व तापी वसतिगृह या दोन वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामध्ये मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आले आहेत जेणेकरून नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांना कुठल्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही यावर भर देण्यात आला आहे.
बार्बर,टेलर,मोची
नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे बार्बर टेलर आणि मोची यांची शॉप उपलब्ध करून देण्यात आले आहे जेणेकरून त्यांच्या अडीअडचणी वेळोवेळी सोडविण्यास मदत होईल.